आगामी काळात रियलिटी शो बिग बॉस मध्ये एक नवीन ट्विस्ट येत आहे. आता बिग बॉसमध्ये अरमानची गर्लफ्रेंड तान्या सिंह घरात एंट्री करणार आहे. त्यामुळे आता घरातील वातावरण काही काळासाठी ढवळून निघणार आहे.

आगामी काळात रियलिटी शो बिग बॉस मध्ये एक नवीन ट्विस्ट येत आहे. आता बिग बॉसमध्ये अरमानची गर्लफ्रेंड तान्या सिंह घरात एंट्री करणार आहे. त्यामुळे आता घरातील वातावरण काही काळासाठी ढवळून निघणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री तनीषा मुखर्जी आणि अरमान कोहली यांच्यातील वाढलेली जवळीकता पाहता तान्या खूप दुखी असल्याचे समजते. सुत्रांने दिलेल्या माहितीनुसार तिची एंट्री कधी होणार यांची काहीच कल्पना नाही. विवेक मिश्राने बिग बॉसच्या घरात ज्या वेळी एन्ट्री केली त्यावेळी तान्या तनीषा आणि अरमानच्या संबधामुळे दुखी असल्याचे समजते.
‘बिग बॉस’मध्ये अरमान आणि तनीषामधील वाढती जवळीकता आता जगजाहिर झाली आहे. प्रत्येक वेळी चूक केल्यानतर तनीषा अरमानची बाजू घेत असते. बिग बॉसच्या घरात तनीषा-अरमान यांच्या शिवाय कुशाल आणि गौहर यांच्यातील प्रेम संबधाबाबत जोरात चर्चा सुरू आहे. यावेळेसचा बिग बॉसचा शो प्रेमसंबधामुळे गाजत आहे.