पुणे – राज्यातील महत्त्वाचे कारागृह असलेल्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात ५० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यास अखेर राज्य गृहविभागाकडून हिरवा कंदिल दाखविला गेला असून येत्या दोन दिवसांत हे कॅमेरे कार्यान्वित होतील असे जेल अधिकार्यांनी सांगितले.

अपेक्षित दहशतवादी हल्ले आणि तुरूंगातील कैद्यांच्या जीवाला असलेला धोका यामुळे या जेलमध्ये सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वीच गृहविभागाला दिला गेला होता. २०१२ सालात इंडियन मुजाहिद्दीनचा कातिल सिद्दीकी याचा याच जेलमध्ये गुंड शरद मोहेाळ याने खून केला होता तेव्हापासून जेलमधील कैद्यांची सुरक्षा हा ऐरणीचा मुद्दा बनला होता असे समजते. जेलमधील संशयित व गुन्हेगारी कारवायांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेर्यांची मागणी म्हणूनच केली गेली होती.
जेल सुपरिडेंटेंड योगेश देसाई म्हणाले की पहिल्या टप्प्यात ५० कॅमेरे बसविण्याची मंजुरी मिळाली आहे. जेलमधील अधिकारी सर्व्हर रूममधून जेलमधील परिस्थिती मॉनिटर करणार आहेत. कॅमेर्यांसाठीचे वायरिंग पूर्ण झाले आहे. हे कॅमेरे मुख्य वॉर्डात तसेच जेलमधील संवेदनशील जागांवर बसविले जाणार आहेत. मागेही जेलमध्ये कैद्यांता आपसात मारामार्या होण्याच्या तसेच हल्ले होण्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांना पायबंद बसण्यासाठी हे कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत.