अफगाण प्रेसिडेंट करझाई भारत भेटीवर येणार

पुणे – अफगाणचे अध्यक्ष हमीद करझाई येत्या डिसेंबरमध्ये भारत भेटीवर येत असून गेल्या सहा महिन्यातली ही त्यांची दुसरी भारतभेट आहे. यावेळी पुण्यातील सिंबायोसिस या आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या निमंत्रणावरून ते भारत भेटीवर येत असून या भेटीत  भारतातील सर्व थरातील नेतृत्त्वाच्या ते भेटी घेणार आहेत.

करझाई मे महिन्यात जालंदर येथील लव्हली प्रोफेशलन विद्यापीठाने त्यांना दिलेली सन्माननीय डॉक्टरेट पदवी स्वीकारण्यासाठी भारतात आले होते. करझाई भारताचे माननीय पाहुणे आहेत असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले असून ते म्हणाले की या भेटीत ते पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटणार आहेत. अफगाणीस्तानातून युनो फौजा माघारी परतल्यानंतर अफगाणची सुरक्षा याविषयी ते चर्चा करतील तसेच त्यांनी भारतातकडे लष्करी सहाय्य देण्याची जी मागणी गेल्या भेटीत केली होती, त्याविषयीही पुन्हा चर्चा होणार आहे.

Leave a Comment