दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी टीम इंडियाची परीक्षा

नवी दिल्ली – टीम इंडियाने या वर्षी वनडे मालिकेत विजयी घौडदौड कायम राखली आहे. त्यालमुळे आता आगामी काळात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेतील नव्या आव्हानासाठी सज्जल राहवे लागणार आहे. आगामी काळात दक्षिण आफ्रिकेचा दौरा टीम इंडियासाठी ‘परीक्षा’च ठरणार आहे. टीम इंडियाने आतापर्यंत आफ्रिकेच्या वेगवान खेळपट्टय़ांवर एकदाही वनडे मालिका जिंकलेली नाही. या वेळी भारत-दक्षिण आफ्रिकेचा पहिला वनडे ५ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.

टीम इंडिया आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळपट्टीवर आपला रेकॉर्ड दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेल. टीम इंडियाला आता आफ्रिकेत सुरुवातीला तीन वनडे सामन्यांची मालिका आणि नंतर दोन कसोटी सामने खेळेल. टीम इंडिया सहाव्यांदा आफ्रिकेच्या दौर्यािवर जात आहे. दुसरीकडे धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया भारतात सलग सहा वनडे मालिका जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या दौर्याववर जात आहे. या वेळी टीम इंडियाकडे वनडे आणि कसोटी मालिका जिंकण्याची सर्वोत्तम संधी असल्याचे मानले जात आहे. सध्या सुरू असलेल्या मालिकेत पाकिस्तानने दोन वनडेत आफ्रिकेवर विजय मिळवल्याने इकडे भारतीय संघाचाही आत्मविश्वास वाढला आहे.

गेल्या काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टीवर खेळणे नेहमीच भारतीयांसाठी आव्हानात्मक काम ठरले आहे. यामुळेच गेल्या २० वर्षांत भारताला कधीही आफ्रिकेत मालिका जिंकता आलेली नाही. भारताने आफ्रिकेत आतापर्यंत पाच कसोटी मालिका खेळल्या असून यातील चार मालिका यजमान आफ्रिकेने जिंकल्या आहेत टीम इंडियाने द. आफ्रिकेत आतापर्यंत १५ कसोटी सामने खेळले असून यात दोनमध्ये विजय मिळवता आला, तर तब्बल सात सामने टीम इंडियाने गमावले. सहा कसोटी अनिर्णीत अवस्थेत सुटले आहेत. त्यालमुळेच या वेळी टीम इंडियाकडून विजयाची अपेक्षा केली जात आहे.