शेतक-यांच्या अल्टिमेटमचा आज शेवटचा दिवस

सांगली: राज्य सरकारला ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेल्या अल्टिमेटमचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे याबाबतीत शुक्रवारी सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आगामी काळात या आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. याबाबतीत सरकारने कोणताही निर्णय न दिल्यास हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, शुक्रवारी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सांगलीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहेत.
या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राजू शेट्टी आपल्या आंदोलनाची रणनिती स्पष्ट करणार आहेत. त्यामुळे सांगलीतल्या पत्रकार परिषदेतल्या राजू शेट्टींच्या भूमिकेवर आंदोलनाचे भवितव्य ठरणार आहे. त्यायमुळे आता ते काय निर्णय घेणार यावर सर्व काही अवलंबून राहणार आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी ऊस दराबाबतची कोंडी फोडली आहे. मंडलिक सहकारी साखर कारखाना उसाला २६५० रुपयाची उचल देणार आहे. राजू शेट्टी आणि मंडलिक यांच्यातील चर्चेनंतर यावर एकमत झाले. पहिला हप्ता २२०० रुपये त्यानंतर दोन महिन्यात उरलेले ४५० रुपये देण्याचा निर्णय मंडलिक यांनी घेतला आहे.