तर मी फाशी घेईन- टायटलर

नवी दिल्ली – नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी माझ्याविरोधात निवडणूक लढून दाखवावी, असे आव्हान देतानाच मी हरलो तर शिक्षा म्हणून स्वत:ला फास लावून घेईन, अशी गर्जना काँग्रेस नेते आणि 1984 च्या शिख दंगलीतील आरोपी जगदीश टायटलर यांनी केली आहे.

भाजपने मोदी यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची माळ घातल्यानंतर काँग्रेसकडून सातत्याने त्यांच्यावर हल्ले सुरू आहेत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापासून सगळेच काँग्रेस नेते मोदी यांच्यावर निशाणा साधत आहेत. त्यात आता जगदीश टायटलर यांनी तर एक पाऊल पुढे टाकत मोदी यांना आपल्याविरूद्ध निवडणूक लढवण्याचे खुले आव्हानच दिले आहे.

दिल्लीतील खासदार राहिलेल्या टायटलर यांनी मोदींना आव्हान देताना सगळ्या सीमा ओलांडल्या. ममोदी यांनी जर आईचं दूध प्यायलं असेल तर यमुनेपलिकडे येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी. माझा या लढाईत पराभव झाला तर मी प्रायश्चित्त म्हणून गळफास घेईन आणि स्वत:ला संपवेनफ, असे टायटलर म्हणाले. मआज तकफ या वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.