चर्चा निश्फळ : कायम तोडगा शोधा – राजू शेट्टी

सांगली – महाराष्ट्रातले उसाचे दर जाहीर करण्याच्या बाबतीत सुरू असलेली मुख्यमंत्री आणि शेतकरी नेत्यांतील चर्चा काल निष्ङ्गळ ठरली. आता दिल्लीत होणार्‍या पंतप्रधानांसमवेतच्या चर्चेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. शेतकरी संघटनेचे नेते उसाला तीन हजार रुपये प्रती टन भाव देण्याच्या मागणीवर ठाम आहेत. परंतु मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे साखरेच्या पडत्या भावाचे कारण पुढे करून उसाला तीन हजार रुपये दर देता येणार नाही या भूमिकेवर ठाम आहेत.

पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी दिल्लीत राज्य सरकारचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचे नेते आणि साखर कारखानदार अशा तीनही क्षेत्रातल्या लोकांना चर्चेसाठी पाचारण केले आहे. अशा प्रकारे चर्चा सुरू असली तरी शेतकर्‍यांचे आंदोलन तीन हजार रुपये दर जाहीर होईपर्यंत जारी राहील, असा निर्धार स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, श्री. राजू शेट्टी यांनी साखरेच्या आणि उसाच्या दराच्या बाबतीत केवळ तात्कालिक विचार न करता या प्रश्‍नावर कायमचा तोडगा काढला पाहिजे आणि उसाच्या दराचा कायमचा ङ्गॉर्म्युला निश्‍चित केला पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.