गेल्याा काही दिवसांपासून अभिनेता सनी देओलची इमेज पंजाबी भूमिकेत बांधली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सनी देओलचे सिनेमे पाहिले तर ‘बॉर्डर’ पासून ते ‘सिंह साहब’ या सिनेमात त्यांनी शिखाची भूमिका केली आहे. आगामी काळात रोल जसा मिळेल त्याप्रमणात मी भूमिका करण्यास तयार आहे. मात्र हे काम करीत असताना अश्लील सिनेमात काम करणार नसल्याचे स्पष्ट केले.
याबाबत बोलताना अभिनेता सनी देओल म्हणाला, माझे फन्स माझा अभिनय पाहून खूश होतात. त्यामुळे मी नेहमीच त्यांना आवडेल अशीच भूमीका करीत असतो. मला स्क्रीनवर जबरदस्त् एंट्री करायला आवडते. मी जरी पंजाबी फैमिली मधून आलो असलो तरी मला लहानपणापासून मला या प्रकारच्या रहानीमानाची आवड आहे. त्यामुळे मी नेहमीच सिनेमात पंजाबी भूमिका करीत असतो.
सिनेमात जर दम असेल तर तो सिनेमा नेहमीच हिट होतो. त्यामुळे प्रत्येक सिनेमाला चांगले ओपिनंग देखील मिळणे गरजेचे आहे. तरच सिनेमा प्रेक्षक पाहतात. सध्या कमी कालावधीत नवीन सिनेमे येत आहेत. त्याचमुळे पुर्वी लाखों अजेट असलेल्या सिनेमाचे बजेट आता कोट़यवधी रूपये झाले आहे. आता प्रत्येक आठवडयाला दोन ते तीन सिनेमे रिलीज होत आहेत. त्यामुळे सुरुवातीपासून चांगली ओपनिंग मिळण्याची गरज आसल्यााचेही यावेळी सनी देओल यांनी स्पष्ट केले.