मुंबई- काही दिवसापूर्वी अभिनेते कमल हासन यांची मुलगी अभिनेत्री श्रुती हासन (२७) हिच्या घरात घुसून तिच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अशोक शंकर त्रिमुखे (३२) याला अटक केली. तो गोरेगावच्या चित्रनगरीतील कर्मचारी आहे.हा व्यक्ती खूप दिवसांपासून श्रुतीचा पाठलाग करत होता. २७ वर्षीय श्रुतीनं, जसा आपला दरवाजा उघडला त्यानं श्रुतीचा गळा पकडला आणि घरात शिरण्याचा प्रयत्न केला होता.
याप्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाच दिवसांपूर्वी वांद्रेतल्या श्रुतीच्या राहत्या फ्लॅटमध्ये सकाळी साडे नऊ वाजता, कोणीतरी बेल वाजवली. तिने दरवाजा उघडताच या व्यक्तीने तिच्या घरी घुसण्याचा प्रयत्न करून तिच्यावर हल्ला केला. श्रुती त्याला ओळख का दाखवत नाही आहे, त्याच्याशी बोलत का नाही, हे जाणून घेण्यासाठी त्याने घरात शिरण्याचा हा प्रयत्न केल्याचे समजते. मात्र श्रुती या परिस्थितीला निर्भयतेनं सामोरी गेली. हल्लेखोराच्या हातावर दरवाजा मारत तिने त्याला पिटाळून लावले होते.
या प्रसंगानंतर काही काळा श्रुती खूप घाबरली होती. हल्लेखोराला बरेचदा श्रुतीच्या सेटवर बघितले गेले होते. श्रुतीने तमिळ सिनेमांसह हिंदी सिनेमातही काम केले आहे. बॉलिवूडमधील ‘लक’ आणि ‘रमैया वस्तावैया’ या सिनेमात तिने काम केले आहे. मात्र, या आरोपीला पोलिसांनी अटक केल्याने श्रतीने निश्वास सोडला आहे.