नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील बलात्काराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. दिल्लीच्या राणीबाग परिसरामध्ये एका आठ वर्षांच्या बालिकेवर सामूहिक बलात्काराची घटना घडली. धक्कादायक बाब अशी की, या कृत्यामध्ये त्या बालिकेचा १३ वर्षांचा नातलगही सामिल असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्यापैकी एकाचे नाव धर्मेंद्र (वय २०) असून त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. तर, दुस-या अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. बालिकेच्या पालकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली.
पीडित बालिकेला उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्याीत आले आहे. येथील रुगणलयात करण्यात आलेल्या वैद्यकीय तपासणीत या पीडितेवर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यावत आला आहे. दोन आरोपींना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले