नेपाळ निवडणुकीत प्रचंड यांना धक्का

काठमांडू – नेपाळमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत युनिफाईड सीपीएन-यूएमएल पक्ष थेट तिसर्‍या क्रमाकांवर फेकला गेल्याने या पक्षाचे अध्यक्ष पुष्पा कमाल दहल ऊर्फ प्रचंड यांनी मतमोजणीची प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली.

युनिफाईड सीपीएन पक्षाला पराभूत करण्यासाठी कारस्थान रचण्यात आले आहे. निवडणूकीचा निकाल लोकांच्या अपेक्षा आणि सर्वेक्षण चाचण्यांचा अंदाजाच्या बिलकूल विपरित आहे. त्यामुळे मतमोजणीची प्रकिया तात्काळ थांबवण्यात यावी अशी मागणी युनिफाईड सीपीएन-यूएमएलने केली आहे.

राजधानी काठमांडूमधून निवडणूक लढवणारे प्रचंड तिस-या क्रमांकावर फेकले गेले असून, या मतदारसंघात नेपाळ काँग्रेसचे उमेदवार राजन के.सी. आघाडीवर आहेत. सुशील कोईराला यांच्या नेतृत्वाखाली नेपाळी काँग्रेस 69 मतदारसंघात आघाडीवर आहे. सीपीएन-यूएमएल 58 मतदारसंघात आघाडीवर आहे तर, प्रचंड यांचा युनफाईड सीपीएन-यूएमएल फक्त 16 मतदारसंघात आघाडीवर आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त नील कांता उपरेत्य यांनी प्रचंड यांची मागणी फेटाळून लावली आहे. नेपाळमध्ये निवडणूका मुक्त वातावरणात झाल्या. मतमोजणी पारदर्शकतेने सुरु आहे. त्यामुळे निवडणूकीचा निकाला प्रत्येकाला स्वीकारावा लागले.