केजरीवालांवर विश्वास, पण माझं नाव वापरू नका -अण्णा

अहमदनगर – माझ्या नावाचा दुरूपयोग होण्याची शंका मला वाटली त्यामुळे मी अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहिलं असं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी स्पष्ट केले आहे. अरविंद केजरीवाल हे स्वच्छ चारित्र्याचे आहेत, ते काही आपले विरोधक नाहीत, त्यांच्याशी केव्हाही चर्चेची आपली तयारी आहे असंही अण्णा म्हणाले.

केजरीवाल यांनी अण्णांचा लोकपाल असा शब्द प्रयोग करू नये अशी इच्छा अण्णांनी व्यक्त केली. पैशाचा मुद्दा हा माझ्यासाठी गौण आहे असेही ते म्हणाले.दरम्यान, अण्णांचा गैरसमज दूर केल्याचा दावा आम आदमी पार्टीचे सदस्य कुमार विश्वास यांनी केलाय.

अण्णांचे पोस्टर वापरल्यावरून गैरसमज झाला होता असं विश्वास यांनी म्हटलंय. सोमवारी अण्णांच्या नावाचा गैरवापर केला म्हणून नचिकेता वाल्हेकर या तरूणांने केजरीवाल यांच्यावर काळी शाई फेकली होती. अण्णांचा केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाच्या सदस्यांनी अण्णांचा विश्वासघात केला असा आरोपही या तरूणांने केला होता.