नवी दिल्ली – माजी लष्कर प्रमुख जनरल व्ही.के. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाची बिनशर्त माङ्गी मागितली आहे. न्यायालयाच्या एका निर्णयावर जनरल सिंग यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून सर्वोच्च न्यायालयाने त्यांना नोटीस पाठविली होती. त्या नोटिसीला उत्तर देताना जनरल सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका केल्याबद्दल माङ्गी मागितली आणि आपला ती टिप्पणी करण्यामागचा हेतू न्यायालयाचा अवमान करणे हा नव्हता, असा खुलासाही केला आहे.
जनरल व्ही.के. सिंग यांनी ४२ वर्षे भारतीय लष्कराची सेवा केली, परंतु निवृत्त होत असताना त्यांच्या जन्म तारखेचा वाद निर्माण झाला. त्यावरून बरीच भवति न भवती झाली. सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि व्ही.के. सिंग यांनीही प्रती ङ्गिर्याद दाखल केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे या ङ्गिर्यादींची सुनावणी करून जनरल व्ही.के. सिंग यांना आपला अर्ज मागे घेण्यास भाग पाडले.
या निर्णयानंतर व्ही.के. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयावर टीका करताना न्यायलयाच्या हेतूविषयी शंका घेतली. त्यामुळे न्यायमूर्तींनी त्यांना नोटीस पाठवून खुलासा विचारला. योग्य तो खुलासा केला नसता तर व्ही.के. सिंग यांना न्यायालयाची बेअदबी केल्याबद्दल शिक्षा झाली असती. मात्र आता त्यांनी न्यायालयाची माङ्गी मागितली असून त्यांच्याविरुद्धच्या कारवाईला स्थगिती मिळण्याची शक्यता आहे.