आपल्याकडील नेतेमंडळी सदरा-पायजमा किंवा पांढ-या रंगाचे शर्ट-पॅण्ट असा पेहराव सगळ्यांच्याच लक्षात येणारा असतो. पण, त्यांनी काहीतरी वेगळेसुद्धा परिधान करायला हवे त्यासाठी त्यांनी आगामी काळात ड्रेसकोड बदलावा असे मत बॉलीवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंगने व्यक्त केले आहे. त्यामुळे आगामी काळात आता नेतेमंडळी अभिनेत्री चित्रांगदा सिंगने सांगितलेली ड्रेसकोड बदलण्याची सूचना अंमलात आणतात की नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
चित्रांगदा ब्लेंडर्स प्राइड फॅशन टूरसाठी गुरगावला गेली होती. यावेळी ती अधिक बोलताना अभिनेत्री चित्रागंदा म्हणाली, ‘भारतातील नेत्यांनी विशेष करून तरुण नेत्यांनी जीन्स आणि टी-शर्ट परिधान केले पाहिजेत. आपल्या देशातील तरुण नेत्यांनी कॅज्युअल कपडे परिधान करायला हवे. आता वेळ आली आहे की, त्यांनी नेहमीच्या कुर्ता-पायजम्याला रजा देऊन जीन्स आणि टी-शर्ट घालायला हवेत. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि कंपनी व्यवहार मंत्री सचिन पायलट हे सर्वात स्टायलिश राजकारणी आहेत, असे मला वाटते.’
अभिनेत्री चित्रांगदाने जरी आगामी काळात भारतातील नेतेमंडळीनी ड्रेसकोड बदलावा अशी इच्छा व्यक्तच केली असली तरी राजकारणी नेते विचार करून यापुढे जीन्स आणि टी-शर्टमध्ये दिसतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.