रशियात विमान कोसळल्याने ५० जण ठार

मॉस्को: रशियात बोईंग विमान कोसळून झालेल्या अपघातात ५० जण मरण पावले आहेत. या विमानात ४४ प्रवासी होते तर ६ विमान कर्मचारी होते. या भीषण अपघातात सर्वजण मरण पावले आहेत. रशियाच्या पश्चिम भागातील कझान विमानतळावर रविवारी रात्री हा अपघात झाला. दरम्यारन घटनास्थमळी बचाव मदतकार्य जोमाने सुरू आहे.

मयतामध्ये तातरस्तान या गणराज्यातील राष्ट्रपतीच्या मुलाचाही समावेश आहे. मॉस्कोहून निघालेलं बोईंग ७३७ हे तातरस्तान विमान कंपनीचे विमान कझानच्या विमानतळावर उतरत होते. विमानाचा धावपट्टीवर उतरण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर पुन्हा एकदा जमीनीवर उतरत असताना अपघात घडला.

त्यानंतर दुस-यांदा धावपट्टीवर उतरताना हे विमान कोसळले. विमान जमीनीवर कोसळल्यानंतर आग लागली. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. दरम्यान, घटनास्थळी बचाव मदतकार्य जोमाने सुरू आहे.