नवी दिल्ली – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठीची पहिली सभा बर्यापैकी गाजली. परंतु दुसर्या सभेचा मात्र विचका झाला. दक्षिपुरी या भागात झालेल्या या सभेची नियोजित वेळ सकाळी नऊची होती, परंतु राहुल गांधी दुपारी एक वाजता सभेला आले. त्यामुळे चार तास वाट पाहून कंटाळलेले अनेक श्रोते अधूनमधून कंटाळून निघून गेले.
राहुल गांधी व्यासपीठावर आले तेव्हा सुद्धा बरेच लोक परत जायला निघाले. त्यांचे भाषण सुरू व्हायला पावणे दोन वाजले. परंतु एवढ्या उशीरा आल्यानंतरही राहुल गांधींनी ङ्गार छोटे भाषण केले. लोक निघून जात असलेले बघून मुख्यमंत्री शीला दीक्षित सुद्धा निराश झाल्या. त्यांनी लोकांना थांबून भाषण ऐकावे अशी विनंती केली.
या सभेत लोकांना बसण्यासाठी खुर्च्या आणल्या होत्या आणि चार हजार खुर्च्या तिथे मांडलेल्या होत्या. परंतु राहुल गांधींचे भाषण सुरू झाले तेव्हा त्यातल्या तुरळक खुर्च्या भरलेल्या दिसल्या. बहुतेक खुर्च्या मोकळ्याच होत्या. वारंवार विनंती करून सुद्धा लोक थांबेनात, तेव्हा राहुल गांधींनी आपले भाषण आटोपते घेतले. शीला दीक्षित आणि राहुल गांधी हे दोघेही सभेला मिळालेला हा प्रतिसाद बघून आपल्या चेहर्यावरची निराशा लपवू शकले नाहीत.