मुंबई- प्रखर हिंदूत्वाचे स्फुल्लिंग चेतवणारे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी प्रथम स्मृतिदिन आहे. ज्या शिवतीर्थावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक ऐतिहासिक सभा घेतल्या त्या शिवतिर्थावर शिवसेना प्रमुखांची स्मृती जपणा-या स्मृतिउद्यानाच्या दर्शनासाठी व शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी रविवारी सकाळपासूनच मोठया प्रमाणात शिवसैनिकांची गर्दी होण्याास सुरूवात झाली आहे.
गेल्या वर्षी १७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले होते. बाळासाहेबांच्याी ओढीने राज्यभरातून मोठया प्रमाणात शिवसैनिक मोठया प्रमाणात शिवाजी पार्क येथे दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. बाळासाहेबांच्या आठवणींनी रविवारी पुन्हा शिवाजी पार्कचा परिसर भरून जाणार आहे. आपल्या भावनांना अश्रूंना वाट मोकळी करून देणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतीदिनी शिवाजीपार्कवर शिवसेनेकडून तयारी करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून येणा-या शिवसैनिकांकडून याठिकाणी बाळसाहेबांना अभिवादन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर अन्य पक्षातील नेतेही यावेळी उपस्थित राहणार असल्याणचे समजते.