मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल गेला असल्याचे समजते.

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्याबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याप्रकरणी एका व्यक्तीवर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल गेला असल्याचे समजते.
राष्ट्रवादी काँग्रसेच्या कार्यकर्त्याने प्रथम हा मजकूर पाहिला व त्यानेच पोलिसांत त्यासंबंधी तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ ए नुसार हा गुन्हा दाखल झाला असला तरी तपासानंतरच संबंधित व्यक्तीला अटक केली जाईल असे पोलिस अधिकार्यांनी सांगितले. या व्यक्तीचे नांव सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.