
नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा काँग्रेसवर वार केलाय. केंद्र सरकारची फक्त माझ्यावरच नजर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला आहे. सध्या मोदी शोधा आणि सोनं शोधा ही दोनच कामं सरकारकडे असल्याचं टीकास्त्र त्यांनी सोडले आहे
.
छत्तीसगडच्या रायगढमध्ये मोदींची सभा झाली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर तोंडसुख घेतलं. तसंच देश विकणारा पंतप्रधान कसा होऊ शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
