
नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायधिशावर नुकताच एका प्रशिक्षणार्थी वकील महिलेने (इंटर्न)लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. आता, अणखी एका इंटर्नने असाच आरोप केला आहे.

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी न्यायधिशावर नुकताच एका प्रशिक्षणार्थी वकील महिलेने (इंटर्न)लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. आता, अणखी एका इंटर्नने असाच आरोप केला आहे.
या इंटर्नने सोशल नेटवर्कींग साईटवर 11 नोव्हेंबरला स्वत:च्या नावासह आपला अनुभव मांडला आहे. लिगली इंडिया या संकेतस्थळाने मात्र तिच्या कॉमेंटस काढून टाकल्या आहेत. याच संकेतस्थळावर पहिल्या इंटर्नने या न्यायधिशांवर लैंगिक छळवणुकीचा आरोप केला होता. ही वकील महिलाही पहिल्या इंटर्नप्रमाणेे कोलकात्यातील नॅशनल युनिर्व्हसिटी ऑफ ज्युरिडिकल सायन्सेस (एनयुजेएस) या कायद्याचे शिक्षण देणार्या संस्थेतील आहे.
या न्यायधिशांकडून एकापेक्षा अधिक वेळेस आपल्याला लैंगिक जाचास सामोरे जावे लागले, असे या इंटर्नने फेसबुकवर म्हटले आहे. आपण या न्यायधिशांवरील पहिल्या इंटर्नच्या आरोपाचा मुद्दा उपस्थित केला असता त्यांनी इतर कुठल्याही महिलेशी गैरवर्तन करणार नसल्याचे आश्वासन दिले. मात्र, या आश्वासनावर विश्वास ठेवणे भोळेपणा होता. केवळ चेहर्यावरुन धैयर्वान दिसण्यापेक्षा प्रत्यक्षात तसे असणे कठीण असते. पहिल्या इंटर्नच्या अंगी प्रचंड धैर्य होते, असा दावा तिने केला आहे.
कुठल्याही प्रकरणात हिंसाचार ही सोपी प्रतिक्रिया असते. मात्र, एक वकील म्हणून आम्हाला केवळ खटल्याचे महत्व समजून चालणार नाही. पहिल्या इंटर्नच्या पाठिंब्यासाठी पुढे येतानाच लैंगिक छळवणुकीसारखा प्रकार एखाद्याबाबत घडल्यास अनेक प्रकारचे गोंधळवून टाकणारे विचार मनात येतात, असेही तिने म्हंटले आहे.
सदर न्यायधिशांचे काम आणि त्यांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हा आपला हेतू नसून इतर मुलींवर अशीच वेळ येवू न देण्याची जबाबदारी आपल्यावर असल्याच्या पहिल्या इंटर्नच्या मताशीही तिने सहमती दर्शविली आहे.कोलकात्याच्या एनयुजेएसकडे या प्रकरणाचा तातडीने तपास करण्याची मागणीही तिने केली आहे.
सहा नोव्हेंबरला पहिल्या इंटर्नने नुकत्याच निवृत्त झालेल्या या न्यायधिशांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर, सरन्यायधिश पी. सदाशिवम यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत चौकशीसाठी तीन न्याायधिशांच्या समितीची स्थापना केली होती.