
राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांच्यात मोठीच हमरातुमरी सुरू असते. या दोन पक्षांनी युती करून सरकार स्थापन केल्यापासून या त्यांचे नेते छान समजुतीने बोलले आहेत आणि एका आवाजात काही बोलले आहेत असे प्रसंग ङ्गारच कमी आहेत. या दोन पक्षातल्या नेत्यांनी परस्परांच्या विरोधात काही विधान केलेले नाही असा दिवस सापडणार नाही. हे दोन पक्षातले भांडण जारीच आहे पण आता राष्ट्रवादीतलेच दोन मातबर नेते परस्परांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहिले आहेत. शरद पवार यांचा धाक कमी झाला म्हणून की काय पण पक्षाच्या दोन नेत्यातला झगडा जाहीरपणे जारी आहे. प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री भास्कर जाधव आणि पाटबंधारे मंत्री सुनील तटकरे यांच्यातला हा सवाल जबाब इतक्या थराला पोचला आहे की, जाधव यांनी तटकरे यांना ङ्गारच उघडे पाडायला सुरूवात केली आहे. तटकरे यांनी आपल्या जिल्ह्यातली कोणकोणती पदे आपल्याच घरात ओढून घेतली आहेत याचीही जंत्री जाधव यांनी दिली आहे. हा असला पक्षांतर्गत संघर्ष राष्ट्रवादीला परवडणारा नाही. कारण हा काही दोन आमदारांतला संघर्ष नाही. तो दोन मातबर नेत्यांतला आहे. दोघेही राज्यातले मोठे नेते म्हणवले जातात. भास्कर जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागरचे आमदार आहेत. सुनील तटकरे हेही कोकणातल्या रायगड जिल्ह्यातले आहेत.
सुनील तटकरे यांच्या पाटबंधारे खात्याने रत्नागिरी जिल्ह्यात एक कार्यक्रम ठेवला पण त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिेकेवर निमंत्रकांच्या यादीत तिथले आमदार म्हणून जाधव यांचे नाव टाकायला हवे होते ते टाकले नाही. या कामाचे श्रेय जाधव यांना न मिळता आपल्यालाच मिळावे यासाठी तटकरे यांनी हा प्रकार केला. हा प्रकार शिष्टाचाराच्या विरुद्ध होता. भास्कर जाधव यांनी त्याची दखल घेणे अटळ होते. तटकरे यांनी असा आणखी एक प्रकार केला होता. दिवे आगार येथील गणेश मंदिरातल्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम त्यांनी आपल्याला श्रेय मिळावे या प्रकारेच केला. या कार्यक्रमात त्यांनी गावकर्यांना विश्वासात घ्यायला हवे होते. पण तसे केले नाही म्हणून अशोभनीय प्रकार घडला. काही दिवसांपूर्वी दिवे आगारच्या मंदिरातली सोन्याची गणेश मूर्ती चोरीला गेली होती. ते मूर्ती हे पर्यटन आकर्षण होते. शेवटी गावकर्यांनी नवी मूर्ती बसवली. तटकरे यांनी आपल्या मर्जीनुसार या मंदिरातल्या मूतींचा प्रतिष्ठापना कार्यक्रम पार पडला. तटकरे यांनी गावकर्यांना न जुमानता आपला कार्यक्रम केला पण गावकर्यांनी त्यांच्या कार्यक्रमावर तर बहिष्कार घातलाच पण नंतर आपल्या सोयीने पुन्हा एका प्रतिष्ठापना सोहळा पार पाडला.
भास्कर जाधव यांची तक्रार योग्य आहे पण ती तक्रार जाहीरपणे करण्याची पद्धत आणि ती करतानाची भाषा योग्य नाही. त्यांनी ही तक्रार पक्षाच्या पातळीवर शरद पवार यांच्याकडे करायला हवी होती. त्यातूनच त्यांची जबाबदारीची जाणीव प्रकट झाली असती. तशी ती व्यक्त होणे गरजेचे होते कारण शेवटी ते प्रदेशाध्यक्ष आहेत आणि तटकरे हे मंत्री आहेत. त्यांनी आपले भांडण चव्हाट्यावर आणणे काही योग्य नाही. आणि त्यासाठी तटकरे यांचा एकेरी उल्लेख करणे हेही योग्य नाही. त्यामुळे पक्षाची प्रतिष्ठा धुळीला मिळाली आहे. भास्कर जाधव हे प्रकरणच तसे विचित्र आहे. त्यांचा असाच जाहीर सवाल जबाब नारायण राणे यांच्याशी झाला होता. तोही सर्वांची करमणूक करणारा होता कारण या भांडणात जाधव यांनी राणे यांची संभावना कोंबडी चोर या शब्दात केली होती. मुळात अनेक लोक जाधव यांना पवारांनी प्रदेशाध्यक्ष का आणि कसे केले असाच प्रश्न विचारत आहेत. कारण त्यांना हे पद देण्यापूर्वी काही दिवस जाधव यांच्या घरचा विवाह सोहळा ङ्गार गाजला होता. राज्यात भीषण दुष्काळ पडला असतानाही त्यांनी आपल्या मुलाच्या विवाहात पैशाची प्रचंड उधळपट्टी केली होती. या उधळपट्टीमुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसची बदनामी झाली. शरद पवार तर ङ्गार चिडले. अशा माणसाला आपल्या पक्षातच काय पण सार्वजनिक जीवनातही काही स्थान नाही अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
राजकारणात विनोदाला काही तोटा नाही पण पवारांनी एवढा मोठा विनोद करावा म्हणजे कमाल आहे. पवार जाधवांनी सार्वजनिक जीवनातही स्थान नाही असे म्हणत होते पण काही दिवसांतच त्यांनी आपले शब्द गिळले आणि जाधव यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मान दिला. जो माणूस सार्वजनिक जीवनातही राहण्याच्या लायकीचा नाही तो आपल्या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होण्यास कसा काय पात्र ठरतो याचा काही खुलासा पवारांनी केला नाही. त्यांनी जाधवांना नेमले पण आपली ही नियुक्ती योग्य नाही हे जाधवांनी स्वत:च दाखवून दिले. अनेकांनी पवारांना वारंवार विचारले की, त्यांनी जाधव यांच्यात असे काय पाहिलेय की त्यांना एवढा मोठा मान द्यावा ? या मागचे कारण ङ्गार महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी कॉंगे्रस संघटनेत आता एवढे हेवेदावे आणि गटबाजी वाढली आहे की तिचा विचार करून नेमके कोणाला प्रदेशाध्यक्ष करावे असा गहन प्रश्न पवारांना पडला. शेवटी त्यांना भास्कर जाधव हाच पर्याय योग्य वाटला. कारण कोकणात अजित पवार यांचे समर्थक असलेले तटकरे ङ्गार बलवान होत आहेत. त्यांना वेसण घालणारा असा कोेणी तरी त्यांना हवा होता. त्या अपेक्षेत भास्कर जाधव बसले. पण आता ते अवघड जागचे दुखणे होऊन बसले आहे.