न्यूयॉर्क- टाइम’ नियतकालिकाने जगातील 16 प्रभावशाली युवतींमध्ये दहशतवादाचा सामना करणारी मलाला युसुफझाई आणि अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची मोठी मुलगी मलिया ओबामा यांचा समावेश केला आहे. टाइम’च्या यादीत संगीत, तंत्रज्ञान, विज्ञान, लेखिका व माध्यमातील नामवंत युवतींचा समावेश आहे.
ओबामा यांची मोठी मुलगी मलिया व छोटी मुलगी साशा यांनी ओबामांच्या दुस-या शपथविधीच्या वेळी दाखवलेली समज वाखाणण्याजोगी आहे, असे टाइम’ने म्हटले आहे. तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्लाचा यशस्वीपणे मुकाबला करणा-या मलाला युसुफझाई हिने मुलींच्या शिक्षणासाठी केलेल्या कामगिरीचा टाइम’ ने गौरव केला.
मृत्युच्या दाढेतून परतल्यानंतर तिने निर्भयपणे दहशतवाद्यांच्या विरोधात आवाज उठवल्याचा उल्लेख टाइम’ने केला आहे. यादीत पॉप स्टार जस्टिन बायबर, गोल्फपटू लायडा को, जलतरणपटू मिस्सी फ्रॅँकलिन आदींचाही समावेश आहे.