नवी दिल्ली – वादग्रस्त मृत्यूमुळे प्रकाशात आलेल्या झिया खान या अभिनेत्रीच्या संशयास्पद मृत्यूचे गूढ उकलत चालले असून तिच्या खुनाची शक्यता दिसत आहे. आजपर्यंत झालेल्या तपासामध्ये तिचा खूनच झाला असावा असे सिद्ध करणारे काही सबळ पुरावे पुढे आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
झिया खानची आई रबिया खान हिने न्यायालयात धाव घेऊन आपल्या कन्येचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला नसून तिचा खून करण्यात आला आहे, असा दावा केला आणि खुनाची शक्यता गृहित धरून तिचा तपास करण्यात यावा अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने जुहू पोलीस ठाण्याला ही चौकशी करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी केलेल्या जादा तपासामध्ये झिया खानची हत्या झाली असावी असे निष्पन्न होत आहे. मुंबईतील कालिना इथल्या ङ्गोरेन्सिक लॅबोरेटरीने झिया खानच्या नखांच्या खाली मांस आणि मानवी रक्त असल्याचे म्हटले आहे. त्या व्यतिरिक्त तिच्या अंतर्वस्त्रावर मानवी रक्त आढळले आहे आणि रक्तात अल्कोहोलचे अंशही सापडले आहे. तिचा खून करून तिला कोणीतरी ङ्गासावर चढवले आहे आणि तिच्या आत्महत्येचा देखावा उभा केला आहे, असे या प्रयोगशाळेच्या तपासामध्ये आढळले आहे.