
नवी दिल्ली – इंटेलिजन्स ब्युरोने भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होण्याचा धोका असल्यासंबंधी पंजाब पोलिसांना नव्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी अनेक दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर आहेत. गृहमंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या पत्रानुसार मोदी यांच्यावर निशाणा साधण्यासाठी लष्करे तैयबा, हिज्बुल मुजाहिद्दीन आणि शाहिद बिलाल या संघटनांनी हातमिळविणी केली आहे. या संघटनांनी मोदींना संपविण्याची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीनवर सोपविली असल्याचेही या पत्रात नमद करण्यात आले असल्याचे इंटेलिजन्स ब्युरोमधील वरीष्ठ अधिकार्या्ने सांगितले.
