नरेंद्र मोदींच्या भाषणाचे दिग्विजय सिंहाकडून कौतुक

नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यातवर कडाडून टीका करण्याचची संधी न सोडणारे काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी नरेंद्र मोदीं यांच्याा भाषणाचे तोंडभरून कौतुक केले आहे. हिंदू -मुस्लीम ऐक्याची शेवटी मोदींना जाणीव झाली ही चांगली बाब असल्याचे दिग्विजय सिंग यांनी सांगितले आहे. दिग्विजय सिंग यांनी ही सर्व स्तुातीसुमने टवीटरवरून उधळली आहेत.

मंगळवारी दिग्विजय सिंगानी ट्विटरवरुन मोदींचे उपहासात्मक शैलीत पुन्हा एकदा कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींच्या हुंकार रॅलीवर भाष्य करताना दिग्विजय म्हणाले, ‘ राजकारणात फायदा किंवा नुकसान होत राहते. मात्र प्रत्येक नेत्याने दंगली होऊ नये याकडे लक्ष द्यायला हवे. यासाठी हिंदू-मुस्लीम एकतेसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाटणा येथील हुंकार रॅलीत नरेंद्र मोदींचे हदयपरिवर्तन झाले त्याचे स्वागतच करायला हवे. भाजप आणि मोदींना शेवटी हिंदू-मुस्लीम एकतेची गरज असल्याचे समजल्याने आनंद वाटला.’

मोदींना खरेच हिंदू-मुस्लीम भाई-भाई हे चित्र पाहायचे असेल तर त्यांनी आधी २००२ च्या गुजरात दंगलीतील पिडीतांचे पुनर्वसन करावे आणि विहिंपच्या नेत्यांना प्रक्षोभक विधान करण्यापासून थांबवायला हवे असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदींनी हुंकार रॅलीत हिंदू-मुस्लीमांनी गरिबीविरोधात लढा देण्यासाठी एकत्र यावे असे सांगत हिंदू-मुस्लीम भाई-भाई असा नारा दिला होता. हिंदूत्ववादी प्रतिमा पुसून धर्मनिरपेक्ष नेत्याची प्रतिमा निर्माण करण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न केल्याचे जाणकार सांगतात.