
वॉशिग्टन – पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशी व्हाईट हाऊसमध्ये वार्तालाप करताना अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा कांही काळ त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत रमले आणि १९८० च्या त्या काळात पाक भेटीवर गेलो असताना तेथे डाळ व खिमा बनविण्यास कसे शिकलो हेही त्यांनी शरीफ यांना सांगितले. कॉलेजमध्ये त्यांचे दोन पाक रूममेट होते व त्यांच्यासोबत ओबामा यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. ती भेट खूपच वंडरफुल होती असे सांगून ओबामा यांनी या मित्रांच्या आईने आपल्याला डाळ व खिमा बनवायचा शिकविल्याचे सांगितले.
