सलमानला मागे टाकून शाहरूख अव्वल

बॉलीवूडचा सिनेअभिनेता शाहरूख खानने अभिनेता सलमान खान आणि महानायक अमिताभ बच्चनला मागे टाकले आहे. या सर्व बॉलीवूडमधील अभिनेत्यांना मागे टाकत त्यांनी ‘भारतातील सर्वात आकषर्क व्यक्ती’ म्हणून अव्वलस्थान पटकाविले आहे.

यासंदर्भात ट्रस्ट रिसर्च एडवाइजरी (टीआरए)कडून देशातील प्रमुख १६ शहरात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या‍नुसार शाहरूख खान ‘भारतातील सर्वात आकषर्क व्यक्ती’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ब्रांड इंटेलीजेंस कंपनी असलेल्याा टीआरएकडून आकर्षक असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत अव्वलस्थानी शाहरूख खाने आहे. त्यानंतर बीग बी अमिताभ बच्चन आणि त्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचे नाव आहे.

आमिर खानचा नंबर या यादीत चौथा आहे. त्याटनंतर या यादीत अभिनेता मिथुन चक्रवर्ती, अभिनेत्री कैटरीना कैफ, सलमान खान, सचिन तेंडूलकर यांची नावे आहेत.यादीत सिनेमा, खेळ, सामाजिक-आध्यात्मिक, बिजनेस आणि संगीत क्षेत्रांशी निगडीत २५ जणांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.