बैलगाडीतून नेले सिंचन घोटाळ्याचे पुरावे

औरंगाबाद – सिंचन घोटाळ्यातील कागदपत्रांचे पुरावे आज भाजपने चितळे समितीला सादर केले. चितळे समिती सध्या सिंचन घोटाळ्याची चौकशी करत आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस बैलगाडीतून हे पुरावे घेऊन माधवराव चितळे यांच्याकडे पोहचले.

सिंचन घोटाळा उघडकीस येईल या भीतीने शासनाने शासकीय विभागांव्यतीरिक्त इतरांकडील कागदपत्रे स्वीकारता येणार नाहीत, अशी अट चितळे समितीला घातली आहे. असा, आरोप विधान परिषदचे विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी केला होता. त्यानंतर राज्यपालांनी चितळे समितीला पुरावे घेण्यास सांगितल्यानंतर आज भाजपने हे पुरावे चितळे समितीला सादर केले.