बगदादच्या कॅफेमध्ये आत्मघातकी स्फोट, 37 जण ठार

बगदाद – इराकची राजधानी बगदाद येथे काल रात्री आत्मघातकी स्फोट झाला. स्फोटकांनी भरलेली कार उडवून देण्यात आली. या स्फोटात 37 जण ठार झाले आहेत. तर देशातील इतर ठिकाणी घडलेल्या हिंसक घटनांमध्ये 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा कॅफेसमोर हा स्फोट झाला तेव्हा कॅफेत अनेक ग्राहक उपस्थित होते. बगदादमधील हा कॅफे आणि जवळच असलेले ज्यूसचे दुकान तरुणांचे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. या स्फोटात 37 जण ठार तर 45 जण जखमी झाल्याचे तेथील अधिकार्‍यांनी सांगितले आहे.