नवी दिल्ली – भारतात द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे मात्र चोरून दुसरे लग्न करणारे अनेक आहेत. त्यात दुसर्या पत्नीस कायदेशीर हक्क मिळत नव्हते पण आता पहिले लग्न झाल्याचे लपवून दुसरे लग्न करणा-या व्यक्तीची दुसरी पत्नीही त्याच्या पतीकडून मिळणा-या कायदेशीर हक्कास पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. अशा दाम्पत्त्याची अपत्यांना हिंदू विवाह कायद्यानुसार वडिलांकडून उदरनिर्वाह भत्ता मिळायला हवे असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने एका तरुणाला दुस-या पत्नीलाही पोटगी देण्याचे आदेश दिले होते. मात्र या निर्णयाला संबंधीत तरुणाने सुप्रीम कोर्टाने आवाहन दिले होते. या प्रकरणाची न्या. रंजना देसाई आणि न्या. ए.के सीकरी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने यावर निर्णय दिला.
हिंदू कायद्यानुसार घटस्फोट न घेता विवाह करण्यास मान्यता नाही. मात्र ज्या प्रकरणात एखादा पुरुष पहिल्या लग्न झाल्याचे लपवून आणखी एका स्त्रीशी लग्न करतो अशा प्रकरणांमध्ये त्या महिलेला कायदेशीररित्या संबंधीत पुरुषाची पत्नी म्हणून ग्राह्य धरता येते. त्यामुळे संबंधीत महिला व तिच्या मुलांना उदरनिर्वाह भत्ता देण्याचे आदेश न्यायालयाने याचिका दाखल करणा-या तरुणाला दिले आहेत.