नवी दिल्ली – अॅपल आपले सर्वात नवे उत्पादन आयफोन ५एस व ५ सी भारतीय बाजारात १ नोव्हेंबर रोजी सादर करत आहेत. दरम्यान त्यांनी बेस फोन म्हणून जाहीर केलेल्या एस चार आयफोनच्या किमती ७ हजारांनी घटविल्या आहेत. आयफोनच्या नव्या फोनची विक्री टेलिकॉम सेक्टरमधील भारती एअरटेल व रिलायन्स कम्युनिकेशन कडून केली जाणार आहे.
गेल्याच महिन्यात अॅपलने आपली नवी दोन मॉडेल जगभरात सादर केली आहेत. आता अॅपल भारतीय बाजारात आपले स्थान पक्के करण्याच्या प्रयत्नात आहे. नोव्हेंबरमध्ये भारतात येणार्यात एस पाच व ५ सी च्या किमतही कंपनीने सादर केल्या असून त्यानुसार ५ एस १६ जीबी, ३२ जीबी व ६४ जीबीच्या किमती अनुक्रमे ५३५०० , ६२,५०० व ७१,५०० रूपये आहेत. एस फोर आता ३१,५०० मध्ये मिळू शकणार आहे. रंगीत पाच सी मॉडेलसाठी १६ जीबी व ३२ जीबी स्टोरेजच्या किमती अनुक्रमे ४१,९००, ५३,५०० रूपये आहेत.