भारतपाक सीमेवर यंदा ईद शुभेच्छा व मिठाईची देवघेव नाही

नवी दिल्ली – गेल्या कांही महिन्यात भारत पाक सीमेवर पाक सैन्याकडून सातत्याने होत असलेल्या युद्धबंधीच्या कराराचे उल्लंघन होत असल्याने यंदा दरवर्षी ईद मिमित्त होणारी मिठाई व शुभेच्छांची देवघेव झाली नसल्याचे लष्करी अधिकार्‍यांनी सांगितले. केवळ भारत पाक सीमाच नव्हे तर जम्मू भागातील आर.एस पुरा भागातील आंतरराष्ट्रीय सीमेवरही ही देवघेव झाली नाही असेही समजते.

लष्करी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात १० वेळा पाककडून युद्धबंदीचे उल्लंघन झाले आहे तर या वर्षात १३० वेळा हे उल्लंघन केले गेले आहे. यामुळे बुधवारी साजर्‍या झालेल्या ईद ला चाकला दा बाग या पछ भागातील क्रॉसिग पॉईंट , तसेच सीमा सुरक्षा दल व पाकिस्तानी रेंजर ऑकट्राय पोस्ट व जम्मू भागातील आंतरराष्ट्रीय सीमा भागात परस्पर शुभेच्छा व मिठाई देवघेव केली गेली नाही. दरवर्षी ईद मिमिताने अशी देवघेव दोन्ही सैन्यांत होत असते.