लंडन – लंडनच्या स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी चार संशयित इस्लामी अतिरेक्यांना अटक केली असून हे चौघे लंडनमध्ये भयानक दहशतवादी हल्याच्या कट रचत होते असा संशय आहे. दक्षिण लंडन पोलिस चौकीत या सर्वांची चौकशी केली जात आहे. या चौघांवरही गेले काही महिने कौंटर टेररिझम पोलिस व एम १५ या हेर विभागाची सतत नजर होती असेही समजते.
स्कॉटलंड यार्डमधील वरीष्ठ पोलिस अधिकार्यामने दिलेल्या माहितीनुसार लंडनच्या विविध भागातून या चौघांना रेड टाकून ताब्यात घेण्यात आले. हे चौघे लंडनवरील हल्ल्याचा कट शिजवत होते. या संदर्भात पोलिस आणखी सहा जणांचाही तपास करत असून दोन वाहनांचा तपासही घेतला जात आहे. अटक केलेल्या चौघांपैकी दोघांना पूर्व लंडनच्या व्हाईट चॅपल भागात असलेल्या गाडीतून ताब्यात घेतले गेले आहे तर अन्य दोघांना अनुक्रमे वेस्टबोर्न ग्रोव्ह व दक्षिण पूर्व लंडनमधून ताब्यात घेतले गेले आहे.