
पॅरिस – जगातील सात आश्चर्यात गणना होत असलेला आणि फ्रान्सचे मुख्य आकर्षण असणार्या आयफेल टॉवरमध्ये काल बॉम्ब ठेवल्याची अफवा येताच तातडीने येथील पर्यटकांना बाहेर काढून हा टॉवर संपूर्णपणे रिकामा केला गेला. धमकी मिळताच सुरक्षा रक्षकांनी तातडीने हालचाली करून या टॉवरच्या आसपासचा सर्व परिसरही मोकळा केला. आयफेल टॉवर उडविण्याची धमकी फोनवरून देण्यात आली मात्र कोणत्याप्रकारे तो उडविला जाईल याचा कोणताच खुलासा धमकी देणार्यालने केला नव्हता असे पोलिसांनी सांगितले.
