आता अनुष्का होणार डिटेक्टिव

आगामी काळात येत असलेल्या सिनेमातून अभिनेत्री अनुष्का शर्मा आता लेडी डिटेक्टिवचा रोल करताना दिसणार आहे. या सिनेमाच्या संदर्भात ‘एनएच १०’ च्याे प्रड्यूसर्स आणि अनुष्का यांच्यात चर्चा सुरू आहे. नवदीप सिंहच्या या सिनेमाची पटकथा अनुष्कासाठी बेस्ट वाटत आहे. यापूर्वी अभिनेत्री विद्या बालनने हा रोल साकारावा यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र तिने हा रोल करण्यास व्यस्त असल्याच्या कारणावरून नकार दिला.

गेल्या वर्षी हा सिनेमा फ्रीडा पिंटोने साइन केला होता. मात्र तिने मे महिन्यानत या सिनेमात काम करण्यास नकार दर्शविला होता. फ्रीडाने या सिनेमाचे शुटिंग वारंवार पोस्टपोन केले जात असल्याने ती परेशान होती. त्यामुळे तिने हा सिनेमा सोडला असल्याचे समजते. तिला प्रड्यूसर्सची भूमिका प्रोफेशनल वाटली.

अभिनेत्री फ्रीडा पिंटोने सिनेमा सोडल्यानंतर नवदीपने सोनम कपूरला अप्रोच केले होते; तिने या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकून घेतली मात्र नंतर काहीच उत्तलर दिले नाही; आता त्यांनी अनुष्काची भेट घेतली आहे. अनुष्काच्या क्लोज फ्रेंडने दिलेल्या माहितीनुसार या ऑफरकडे ती पॉजिटिवली बघत आहे. नवदीपने केलेल्या चर्चेमुळे ही डील फायनल होणार असे दिसत आहे. अनुष्काने जर नाही म्हटले तर पुन्हा नवदीपला नवीन हिरोईनचा शोध घ्यावा लागणार आहे.