लारा करतेय साडी डिजाईन

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवुडमधील सिलेब्स अक्टिंगसोबतच आता दूसरे पण काम करीत आहेत. तर काही जण रियल एस्टेट या फील्डशी जोडले गेले आहेत. लारा आता अभिनय क्षेत्रासोबतच डिजाइनची साडी लॉन्च करीत आहे. या संदर्भात ती नुकतीच भोपाल येथे गेली होती. लाराने त्यासाठी आता ब्रैंड सोबत टाईअप केले आहे. लाराने भारतीय महिलांना डोळयासमोर ठेवून या डिजाइन्सची निवड केली आहे.

लारा या नवीन करियरसाठी आता खूपच एक्साइटेड आहे. या बाबत बोलताना लारा म्हाणाली, ‘ मी नवीन कलेक्शनमुळे खूपच एक्साइटेड आहे. मी भारतीय महिलांना डोळयासमोर ठेवून साडीचे नवीन रेंज डिजाइन बाजारात आणले आहे. मला मिळत असलेल्या रेस्पॉन्समुळे मी खूपच खूष आहे. गेल्या काही दिवसांपासून या कामात मी खूपच बिजी आहे.’

लारा आई झाल्यापासून सिल्वर स्क्रीनवरून गायब झाली आहे. तिला करियरच्या या स्टेजवर हे काम करताना आनंद होत आहे. लारा आता आगामी काळात या नवीन डिजाइनच्या साडी करण्याच्या कामात तर यशस्वी होणार की नाही हे येणारा काही दिवसात समजेल.