मुंबई – शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला अखेर आज मुंबई उच्च न्यायालयानं हिरवा कंदील दाखवला, मात्र परवानगी देतांना ध्वनीप्रदुषणाच्या नियमांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही न्यायालयाने शिवसेनेला दिलेत.

डिस्ट्रीब्युटेड साउंड सिस्टीमचा वापर करुन आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भातील अट टाकत आज (मंगळवार) मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी दिली.
शिवसेना आणि शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा हे गेली 47 वर्ष अव्याहत चालणारे समीकरण आहे. आज मुंबई उच्च न्यायालयानेही या समीकरणाला हिरवा कंदील दाखवत शिवतिर्थावरच दसरा मेळावा साजरा करण्याची परवानगी शिवसेनेला दिली. न्यायालयासमोर आपले गार्हाणे मांडत शिवसेनेने एमएमआरडीए मैदान आपल्यासाठी कसे योग्य नाही हे सांगत शिवाजीपार्कचे महत्त्व न्यायालयाला पटवून देण्यात यश मिळवले.