वॉशिंग्टन – प्लॅस्टिक मानवाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे.प्लॅस्टिकवर आजपर्यंत पूर्णपणे मानवाचा अधिकारच समजला जात असे. परंतु मानवाचा महान शोध असलेले प्लॅस्टिक हे शनीच्या टायटन या चंद्रावर आढळून आले आहे. नासाने टायटनवर पाठवलेल्या कॅसिनी अंतराळ यानाला हे प्लॅस्टिक सापडले आहे. या प्लॅस्टिकच्या रूपात शास्त्रज्ञांना प्रथम परग्रहावर रासायनिक घटक सापडले आहेत.
अंतराळातही सापडले प्लॅस्टिक
सूर्यमालिकेत असलेल्या काही ग्रहांपैकी टायटन हा एक असा ग्रह आहे ज्यावरील वातावरण हे हायड्रोकार्बनने बनलेले आहे. टायटनवर नायट्रोजन वायू मोठया प्रमाणात असून, येथे मिथेन आणि इथेनचे ढग आहेत. त्याचबरोबर पृथ्वीवर ज्याप्रमाणे पाण्याचा पाऊस पडतो. त्याप्रमाणे टायटनवर मिथेन व इथेचा पाऊस पडतो. या ग्रहावर इथेन व मिथेन हे द्रव रूपात मोठया प्रमाणात उपलब्ध असून, मिथेन व इथेनच्या नद्या, तलाव व समुद्रही टायटनवर आहे. अशा या टायटन ग्रहावर प्लॅस्टिक सापडल्याने शास्त्रज्ञांना आशेचा किरण दिसू लागला आहे.
टायटनवर सापडलेल्या या प्लॅस्टिकमुळे येथे कोणती रासायनिक प्रक्रिया सुरू आहे, तसेच पृथ्वीवर ऑक्सिजन नसताना कोणती रासायनिक प्रक्रिया घडली असेल याचा शोध घेण्यास शास्त्रज्ञांना मदत होणार आहे. कॅसिनीच्या कॉम्पोझिट इन्फ्रारेड स्पेक्टोमीटरला (सीआयआरएस) टायटनच्या कमी दाबाच्या वातावरणात प्रोपिलिनचा लहान तुकडा सापडला आहे.
दरम्यान, 1980 मध्ये प्रथम पाठवलेले व्हॉयेजर-1 या अवकाश यानाला टायटनवर अनेक वायू दिसून आले होते. हे वायू पृथ्वीवर प्रामुख्याने पेट्रोलियम पदार्थाच्या उत्खननामध्ये सापडत असल्याचे स्पष्ट झाले होते. पण हे सर्व वायू हे एक किंवा दोन कार्बन फॅमिलीचे घटक होते. पण या वेळी कॅसिनीच्या माध्यमातून शास्त्रज्ञांना तीन कॉर्बन फॅमिलीतील घटक असलेले प्लॅस्टिक सापडले आहे.
