श्रीनगर – श्रीनगर येथील सौरा भागात एका घरात दडून बसलेले दहशतवादी आणि पोलिसांमध्ये सुरु असलेली चकमक संपली आहे. परंतु दहशतवाद्यांना लिसांचा वेढा तोडून पळून जाण्यात यश आले आहे. तर या चकमकीत 6 पोलीस जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
श्रीनगरमधील दहशतवादी फरार; चकमक संपली
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर येथील सौरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार पोलिसांनी या भागात घेराव घालून शोध मोहीम सुरू केले. या दरम्यान पोलिसांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून त्यात 5 पोलीस जखमी झाले. अजूनही दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असून घटनास्थळी अतिरिक्त सैन्यबळ पोहोचले आहे.
