द हेग – जगभरात रासायनिक शस्त्रांवर लक्ष ठेवणा-या ऑर्गेनाइजेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (ओपीसीडब्ल्यू) च्या 20 तज्ज्ञांची टीम सीरियातील रासायनिक शस्त्रांचे प्रमाणित करण्याचे काम या आठवड्यापासून सुरू करणार आहे.

हे काम रासायनिक शस्त्रे नष्ट करण्याच्या योजनेचा पहिला टप्पा असेल. ओपीसीडब्ल्यूच्या अधिका-यांनी सांगितले की, निरीक्षकांची टीम सीरियात मंगळवारच्या आधी सुरू करणार नाही. या दिवशी टीम सीरियाच्या राजकीय नेत्यांशी संपर्क करेल.
द हेग स्थित संस्थेच्या अधिका-यांनी सांगितले की, तज्ज्ञ सोमवारी राजधानी दमिश्कला जातील आणि आंतरराष्ट्रीय समुदाय व संयुक्त राष्ट्राला स्वीकृत करारानुसार सीरियामध्ये 2014 च्या मध्यापर्यंत रासायनिक शस्त्रे नष्ट करण्याचे काम सुरू करेल. पहिल्या टप्प्यात सीरियाने या रासायनिक शस्त्रसाठ्याबाबत दिल्या जाणा-या माहितीनुसार ते प्रमाणित करण्याचे काम होईल. त्यानंतर निर्माण स्थळासह शस्त्रही नष्ट केले जातील.