शट डाऊन’मुळे अमेरिकेचे होणार मोठे नुकसान – ओबामा

वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या शट डाऊनचा परिणाम तिथल्या अर्थव्यवस्थेवर होऊन अमेरिकेचे मोठे नुकसान होण्याची शक्यता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्यक्त केली आहे. अमेरिकेतील सद्य परिस्थितीबाबत रिपब्लिकन पार्टीला जबाबदार असल्याचे ओबामा म्हणाले.

10 लाख कर्मचार्‍यांना सक्तीच्या सुट्टीवर जावे लागले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचं महत्त्वाकांशी विधेयक असलेलं स्वास्थ विधेयक ओबामाकेअर’वरुन झालेल्या मतभेदांमुळे रिपब्लिकन आणि सत्ताधारी ड्रेमॉक्रेटिक पक्षांमध्ये खर्च आणि बजेटवरुन सहमती झाली नाही. त्यामुळंच अमेरिकेवर हे शट डाऊन’चं संकट ओढवले आहे.

ओबामा म्हणाले की, मला माहितीये सरकारचं कामकाज जितके दिवस ठप्प राहील त्याचा दुष्परिणाम खूप होईल आणि त्यामुळं अनेक कुटुंबांना त्याचा फटका बसेल. व्यापारावर सुद्धा परिणाम होईल. ओबामांनी बजेट पास करण्यासाठी काँग्रेसला विनंती केली आहे.