नवी दिल्ली – पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी त्यांच्या राजीनाम्याची शक्यता फेटाळून लावली आहे. लोकप्रतिनिधी वटहुकूमाबाबत आपण कॉँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार असून माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंगळवारी सांगितले.
राजीनामा देणार नाही – पंतप्रधान
येत्या निवडणुकीत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात धर्मनिरपेक्ष पक्षांनी मोट बांधावी, असे आवाहनही त्यांनी केले. अमेरिकेच्या दौर्यांहून मायदेशी परतताना पत्रकारांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मनमोहन सिंग मंगळवारी राहुल गांधी यांना भेटणार आहेत.
पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. कुणी काय म्हटलं तर त्याला मी कसा जबाबदार असेल?, असं उत्तर पंतप्रधानांनी अमेरिका दौऱयावरून परतल्यानंतर दिले आहे. राहुल गांधी यांनी अध्यादेशाला फाडून टाकले पाहिजे असे वक्तव्य केले होते, त्यावर पंतप्रधानांनी हे उत्तर दिलं आहे. मी राहुल गांधी यांचं वक्तव्य ऐकलं आहे, लोकशाहीत राजकीय मुद्दे उपस्थित करणे, त्यावर विचार करणे, चर्चा करणे हा योग्य मार्ग आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
