कमल हसनला जीवनगौरव पुरस्कार

सिनेसृष्टीतील असामान्य योगदान आणि कार्यासाठी देण्या्त येणारा यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही कमल हसन आणि फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा गव्रस यांना जाहीर झाला आहे. तामिळ सुपरस्टार कमल हसन हा जीवनगौरव पुरस्कार नोव्हेंरबर महिन्यात आयोजीत करण्यानत आलेल्या पंधराव्या मुंबई चित्रपट महोत्सवा दरम्यान देण्यात येणार आहे.

‘द मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेजेस (मामी)’ च्या वतीने दरवर्षी हा पुरस्कार चित्रपटसृष्टीती अफाट योगदानाबाबत देण्यात येतो. या पुरस्काराबाबत माहिती देताना मामीचे अध्यक्ष श्याम बेनेगल म्हणाले, ‘दिग्दर्शक-अभिनेता कमल हसन यांच्या सिनेसृष्टीतील असामान्य योगदान आणि कार्यासाठी यंदाचा जीवनगौरव पुरस्कार आम्ही कमल हसन आणि फ्रेंच दिग्दर्शक कोस्टा गव्रस यांना देणार आहोत. या पुरस्काहराचे वितरण पुढील महिन्यात एका कार्यक्रम प्रसंगी देण्यात येणार आहे.’

१७ नोव्हेवबरपासून सुरु होणा-या या पंधराव्या मुंबई चित्रपट महोत्सवात विविध अशे ६५ देशांतील २०० सिनेमे दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात होणारा हा मुंबई चित्रपट महोत्सव प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.