‘हैप्पी एनिवर्सरी’ मधून झळकणार अभिषेक-ऐश्वर्या

आगामी काळात पति-पत्नी असलेले अभिषेक आणि ऐश्वर्या राय-बच्चन निर्माता गौरांग दोशीच्या ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमातून एकत्रित झळकणार आहे. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि अर्जुन रामपाल स्टारर ‘आंखें’ (२००२) आणि ‘दीवार’ (२००४)चा निर्माता असलेला गौरांग आता बॉलीवुडमध्ये दोन सिनेमा घेवून येत आहे.

वैवाहिक संबंधावर आधारित असलेल्या प्रल्हाद कक्कड यांच्या ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमातून ऐश्वर्या व अभिषेक बच्चन ए‍कत्रित काम करणार आहेत. याबाबत अधिक बोलताना निर्माता गौरांग म्हणाला, ‘‘हैप्पी एनिवर्सरी या सिनेमातून ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांचे नाव फायनल करण्यात आले आहेत. दोघांचा विवाह एक सिनेसष्टीत आदर्श मानला जात आहे. दोघपण ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमातील भूमिकेसाठी सुटेबल वाटत असल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनला ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमाची पटकथा पसंत पडली आहे. त्यामुळे त्यांनी या सिनेमात काम करण्यास होकार दर्शविला आहे.

आरध्याच्या जन्मानंतर ऐश्वर्याने सिनेमात काम करणे सोडले होते. त्यानंतर आता आगामी काळात ती पती अभिषेक बच्चन सोबत ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमातून पुनरगामन करणार आहे. ‘हैप्पी एनिवर्सरी’ या सिनेमाचे ६५ कोटी रुपये बजेट असून या सिनेमाची शूटिंग पुढील वर्षी दक्षिण अफ्रीकेत सुरू होणार आहे.

Leave a Comment