माद्रिद – स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये रियल माद्रिदने गेटाफे सीएफचा पराभव केला. यजमान संघाने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला. यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या बळावर माद्रिदने विजय मिळवला.

माद्रिद – स्पॅनिश फुटबॉल लीगमध्ये रियल माद्रिदने गेटाफे सीएफचा पराभव केला. यजमान संघाने ४-१ अशा फरकाने सामना जिंकला. यामध्ये क्रिस्टियानो रोनाल्डोने केलेल्या दोन गोलच्या बळावर माद्रिदने विजय मिळवला.
क्रिस्टियानो रोनाल्डोने, पेपे आणि इस्को यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात योगदान दिले. महागडा फुटबॉलपटू गॅरेथ बेलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली. याचा फायदा घेत पाहुण्या टीमने दमदार सुरुवात करताना पाच मिनिटांत १-० ने आघाडी घेतली. तजेल लफिताने गेटाफेकडून पहिला मैदानी गोल केला. या संघाला ही आघाडी फार काळ कायम ठेवता आली नाही.
त्यानंतर रियल माद्रिदने सामन्यात १-१ ने बरोबरी साधली. पेपेने १९ व्या मिनिटाला मैदानी गोल केला. त्यानंतर रोनाल्डोने संघाला २-१ ने आघाडी मिळवून दिली. त्याने ३३ व्या मिनिटाला पेनॉल्टी कार्नरवर गोल केला. लढतीत ५९ व्या मिनिटाला इस्कोने वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरा मैदानी गोल केला. त्यानमुळे ४-१ ने माद्रिद विजयी केले.