बीड : भटक्या विमुक्त जाती महामंडळातील कर्जपुरवठ्याच्या फाईल मंजूर न केल्याने संतप्त अर्जदारांनी उपराकार लक्ष्मण माने यांच्या तोंडाला सोमवारी रात्री काळे फासले. लक्ष्मण माने हे महामंडळाचे माजी अध्यक्ष आहेत.

भटक्या विमुक्त जाती महामंडळाच्याच अध्यक्षपदाच्या काळात उपराकार माने यांनी कर्ज मंजूर न करता, फाईल्सकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कर्जासाठी अर्ज केलेल्याय काही नागरिकांनी केला आहे. दरम्यान, ही सर्व आपलीच माणसे आहेत. त्यामुळे त्यांची तक्रार करणार नाही, पण त्यांची निषेध करण्याची पद्धत चुकीची होती, असे माने यांनी म्हटले आहे.
यापूर्वी साता-यात लक्ष्मण माने यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप आहे. या आरोपामुळे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती.२५ मार्चला मानेंच्या विरोधात तीन महिलांनी लैंगिक शोषणाची तक्रार दिली होती.