हतिक,सुझानचे संबध चांगलेच- फराह खान

बॉलीवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन आणि सुझान हे दोघे पती-पत्नी घटस्फोट घेणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तरी पण हे दोघेजण अजूनही एकमेंकावर खूप प्रेम करतात. काही कारनामुळे जरी या दोघाचे खटके उडाल्याने दोघे जण दूर राहत आहेत. त्याचा अर्थ दोघांचा घटस्फोट झाला असा होत नाही. त्यांच्यातील संबध अजूनही चांगले असल्याचा खुलासा सूझानची बहिण फराह खान अली हीने केला आहे.

हतिक रोशनने बॉलीवूडमध्ये ‘कहो ना प्यार है’ सिनेमातून पदार्पण केल्यानंतर लगेचच तो सुझान खानसोबत लग्नबंधनात अडकला. मात्र, काही दिवसांपासून हृतिक आणि सुझानचा घटस्फोट होणार असल्याची बातमी आहे. पण, हे दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यात सर्व सुरळित चालले आहे. तसेच, त्यांचा घटस्फोट होणार असे सुझानची बहिण फराह खान अली हिने म्हटले आहे.

सेलिब्रिटींवर नेहमीच गॉसिप केले जाते. तुम्ही जे वाचता त्यावर विश्वास ठेवू नका. त्या दोघांना त्यांचे वैयक्तिक आयुष्य जगू दे, असे फराहने ट्विट केले आहे. सुझान आणि हृतिक यांचे २००० साली लग्न झाले. सुझान आणि हृतिक एकमेकांना आधीपासूनच ओळखायचे. लग्नानंतरही त्यांचे चांगलं पटत होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत.