सनरायझर्स हैदराबादच्या खेळाडूचे सट्टेबाजांशी लागेबांधे

मुंबई- इंडियन प्रीमियर लीग मधील सनरायझर्स हैदराबाद व पुणे वॉरीयर यांच्यात १७ मे रोजी झालेला सामना फिक्स असल्याघचे समजते. यावेळी मध्यस्थी सट्टेबाजांच्या मदतीने सनरायजर्सच्या चार खेळाडूंशी भेट घेतल्याचे सट्टेबाज चंद्रेश पटेलने जबानीत सांगितले. पुण्यातील हा सामना फिक्स करूनही हैदराबाद संघ जिंकल्याने संबंधित बुकीचे नऊ कोटी रुपये बुडाले. त्यामुळे सट्टेबाजांमध्ये भांडण झाले होते. त्याटमुळे सनरायझर्सच्याय परेरा, विहारी, आशीष रेड्डी व करण शर्मा या खेळाडूचे सट्टेबाजांशी लागेबांधे असल्यायचे उघड झाले आहे.

या प्रकरणातील आरोपी चंद्रेश पटेलचा जबाब गुन्हे शाखेचे मालमत्ता कक्षाचे अधिकारी आणि गुन्हे शाखेने नोंदवला. त्यातून ही बाब उघड झाली. पटेलचा मित्र विन्नीने त्याची ओळख युसुफ व आमिर या दोन सट्टेबाजांशी करून दिली. त्यानंतर मार्चमध्ये पटेल व त्याचा साथीदार प्रवीण ठक्कर ऊर्फ पिंटू यांनी आमिर, युसूफ यांच्यासोबत हैदराबादला भेट घेतली.

आमिरने हैदराबाद येथील मॅच फिक्स करायला पाच कोटी व एक कोटी कमिशन अशी सहा कोटींची मागणी केली. ही बाब पिंटूने त्याचा साथीदार व सट्टेबाज जितू जैन यांना सांगितली. पटेल, पिंटू, युसूफ व जितू १६ एप्रिलला पुण्यात गेले. तेथे आमीरचा मित्र सुनिलने सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू परेरा, विहारी, आशीष रेड्डी व करण शर्मा यांच्यासोबत भेट करून दिली. त्या वेळी खेळाडू आशीष रेड्डीचा भाऊ प्रीतम रेड्डीही उपस्थित होता. हैदराबादचा खेळाडू दुस-या षटकात बाद झाल्याचा संकेत लक्षात घेऊन जितू जैनने पहिल्या दहा षटकात ६० धावा होणार नाहीत, यावर साडेतीन कोटींचा डाव लावला, तर हैदराबाद हरणार यावर ९ कोटींचा सट्टा लावला. त्यातील १० षटकांचा सट्टा जितूजिंकला. त्यानंतर संध्याकाळी आमीरने पटेलकडे पैशांची मागणी केली. त्यावर हैदराबाद संघजिंकल्याने पटेलने पैसे देण्यास नकार दिला.

Leave a Comment