मुंबई- गेल्या अनेक वर्षांपासून काही जण गुडघ्याला बाशिंग बांधून पंतप्रधापदाच्या शर्यतीत संधीची मिळण्याची वाट पाहत बसले आहेत. मात्र त्यांची इच्छा पूर्ण झाली नसल्याने ते थकले आहेत. अजुनही त्यांना पंतप्रधानपदाचे स्वप्न पडत आहेत, अशा शब्दांत फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्य मंत्री नरेंद्र यांच्यावर टीका करणारे राष्ट्रावादी कॉंग्रेसचे अध्येक्ष शरद पवार यांना त्यांच्या शब़दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले.
मुंबईतील एका कार्यक्रमप्रसंगी केंद्रीयमंत्री शरद पवार यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली होती. ‘उतावळा नवरा आणि गुडघ्या्ला बाशिंग’, अशा शब्दात पवारांनी मोदींना टोला लगावला होता. पवार म्हणाले, ‘निवडणुका वर्षभर लांब आहेत, अजून कशात काही नाही. तरीही काही जणांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पंतप्रधानपदाचे स्वप्नद पूर्ण करण्यासाठी लोकसभेत आवश्यक जागा जिंकणे गरजेचे आहे. त्याच मिळविता येणे शक्य नसल्याचे जाणवल्यानंतर काही जण देशात जातीय दंगली पसरविण्याचे काम करत आहेत. त्यामुळे धर्मनिरपेक्ष शक्तींनी अशांविरुद्ध एकत्र येण्याचे आवाहनही त्यांनी केले.’
भाजपचे प्रदेशाध्य्क्ष देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला त्यांचे नाव न घेता प्रत्युत्तर दिले. फडवणीस म्हणाले, ‘केवळ सात-आठ खासदार असलेल्या पक्षाचे नेते सुध्दा पंतप्रधान व्हायचे स्वप्न पाहत आहेत. अनेक वर्षांपासून ते गुडघ्या्ला बाशिंग बांधून बसले आहेत.’