पाच राज्यात या वर्षात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांसाठी टाईम्स नाऊ आणि हेडलाइन्स टुडे या वाहिन्यांनी घेतलेल्या ओपिनिअन पोल नुसार दिल्लीत आगामी सरकार बनविताना नुकत्याच स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाची भूमिका किंगमेकर म्हणून असेल असा अंदाज वर्तविला गेला आहे. काँगेसला सत्ता गमवावी लागण्याची दाट शक्यता असली तरी भाजपलाही पूर्ण बहुमत मिळू शकणार नाही मात्र आम आदमी पक्षाला या निवडणुकांत सात ते नऊ जागा मिळतील. भाजपला २८ ते ३० तर काँग्रेसला २७ ते २९ जागा मिळतील. यामुळे आम आदमी पक्षाची भूमिका कळीची ठरणार आहे.
या पोलनुसार मध्य प्रदेश व छत्तीसगढ येथे भाजप सत्ता टिकवेल तर राजस्थानात ती काँग्रेसच्या हातून निसटून भाजपकडे येईल असे दिसून आले आहे. मध्यप्रदेशात विधानसभेच्या २३० जागांपैकी भाजपला १३० जागा मिळतील व शिवराज चौहान सलग तिसर्यां दा मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील असा निष्कर्ष निघाला आहे. छत्तीसगढ मध्येही रमणसिग सत्ता राखतील. येथे असलेल्या ९० सीटमध्ये भाजपला ४७ ते ५० जागा तर काँग्रेसला ४० जागा मिळतील.
राजस्थानात मात्र गेहलोत सरकारला पराभवास सामेारे जावे लागेल असे दिसून आले असून येथील २०० जागांत भाजप ९८ ते ११८ जागा घेईल अशी चिन्हे दिसत आहेत. काँग्रेसला ६४ ते ७९ दरम्यान जागा मिळतील. टाईम्स नाऊच्या पोलप्रमाणे देशात पंतप्रधानपदासाठी सर्वाधिक चॉईस नरेंदा्र मोदी यांना आहे. त्यांना ४८ ते ५५ टक्के लोकांनी पसंती दर्शविली आहे. राहुल गांधींना १८ टक्के तर मनमोहनसिंग यांना ३ ते ७ टक्के लोकांनी पसंती दिली आहे.